विखेंचा भाजप प्रवेश निश्‍चित ; फक्‍त मुहूर्त बाकी ; गिरीष महाजन !

Foto

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे वजनदार नेते राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित आहे. केवळ मुहूर्त बाकी आहे. तारीख ठरायची आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगरमधून लोकसभा निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

मुलाला तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या निवडणुकीदरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि मुलाला भाजपची उमेदवारी मिळवून देऊन मोठ्या मताधिक्याने निवडूनही आणले. त्यामुळे आता विखे-पाटील यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यांनी भाजपचा पर्याय निवडला असून, भाजप प्रवेशानंतर विखे यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर विखे-पाटील यांनी आज भाजप नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तो मुहूर्त आणखी लांबणीवर पडला आहे.  खुद्द महाजन यांनीच याबाबत माहिती दिली. विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणालाही काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये राहण्याची इच्छा नाही. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker